पत्नीने पतीला परमेश्वर मानून त्याच्या पाया पडावे, असे मानणाऱया जुनाट परंपरांना छेद देत दिल्लीचे महिला व बालकल्याण मंत्री संदीप कुमार यांनी नवाच पायंडा पाडला आहे. मी रोज सकाळी माझ्या पत्नीच्या पाया पडतो, अशी कुबलीच त्यांनी नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने दिली.
संदीप कुमार हे मूळचे हरियाणातील सारंगथल गावातील आहेत. २०११ मधील जनगणनेनुसार हरियाणामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण एकदम कमी आहे. या वास्तविकतेमुळे स्वतः संदीप कुमारही चिंतेत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आत्तापर्यंतच्या वैयक्तिक आयुष्यातील वाटचालीत साथ दिल्याबद्दल ते आपल्या पत्नीचे आभार मानतात. पाच एप्रिल २०११ मध्ये संदीप कुमार आणि रितू यांचे लग्न झाले. तेव्हापासूनचे ते रोज सकाळी न चुकता आपल्या पत्नीच्या पाया पडतात. ते म्हणतात, कधी कधी पाया पडल्यावर, खूप प्रगती कर असा आशीर्वाद ती देते. पण बऱयाचवेळा तिच्या चेहऱयावर फक्त हसू असते. ती तुला सौभाग्यवती राहा, असा आशीर्वाद देत नाही का?, असा प्रश्न माझे मित्र मला मिश्किलपणे विचारतात.
याबद्दल आपल्या भावना मांडताना रितू म्हणाल्या, ते जेव्हा माझ्या पाया पडतात तेव्हा माझ्या चेहऱयावर फक्त हसू असते. ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात तिथे त्यांना यश मिळू दे, अशी भावना माझ्या मनात असते.
संदीप आणि रितू यांची पहिली भेट दिल्लीतील दयाल सिंग महाविद्यालयात झाली. लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी साधारणपणे आठ वर्षे त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनाही आपली पहिली भेट कधी झाली हे आजही लख्खपणे आठवते. पुढे जाऊन आपले संदीप यांच्याबरोबरच लग्न होईल, असे त्यावेळी कधीही वाटले नव्हते, अशीही आठवण रितू यांनी सांगितली.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा