मेक्सिको सिटीला मंगळवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. यामध्ये ११९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मेक्सिकोमधील स्थानिक प्रशासनाच्या हवाल्यानं एपी वृत्तसंस्थेनं दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेनेनुसार भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली. मेक्सिकोतील रोबोसो या शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. मेक्सिकोत भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. इमारती कोसळल्यामुळे ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. भूकंपामुळे जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. बचावपथकाकडून ढिगा-यांखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मेक्सिको सिटी विमानतळावरील विमानांची उड्डाण रोखण्यात आली आहेत.

यापूर्वी १९८५ मध्ये मेक्सिकोला भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी झालेल्या या भूकंपामुळे मेक्सिकोतील नागरिकांना १९८५ च्या त्या भूकंपाची आठवण झाली.