22 October 2017

News Flash

दिल्लीमधील चांदनी चौकात आग

चांदनी चौकमधील भगीरथ पॅलेसच्या आसपास काही इमारतींना आज (गुरूवार) संध्याकाळी मोठी आग लागली. आगीची

नवी दिल्ली | Updated: December 13, 2012 7:34 AM

चांदनी चौकमधील भगीरथ पॅलेसच्या आसपास काही इमारतींना आज (गुरूवार) संध्याकाळी मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अगिनिशमन दलाच्या २५ गाड्या रवाना झाल्या आहेत. साधारणत: मोठी आग असल्यास अगिनिशमनदलाच्या १५ गाड्य़ा पाठवण्यात येतात. अद्याप कोणत्याही जीवीतहानीचे वृत्त नाही. या ठिकाणावरून एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या इमारतीत ५० हून अधिक दुकानं आहेत.
सदर भागात अतिशय लगान रस्ते असल्याने अग्लिशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास त्रास होत आहे. असं सांगितलं जात आहे कि, या ठिकाणी फक्त प्लास्टिकच्या सामानाचं गोदाम होतं. तसेच या इमारतीत इलेक्ट्रॉनिक वस्तूही मिळातात, अशी माहिती मिळाली आहे.
पाच मजली इमारतीला पहिल्यांदा इमारतीच्या तीस-या मजल्याला आग लागली आणि ती आग पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

First Published on December 13, 2012 7:34 am

Web Title: major fire in chandni chowk market