मलेशियाची राजधानी क्वाललंपूरमध्ये एका धार्मिक शाळेत गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. यात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात कर्मचाऱ्यांसह २३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तहफीझ दारूल कुराण इत्तिफकियाह नावाची ही शाळा क्वाललंपूरच्या मध्यवर्ती भागात आहे. या शाळेच्या इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन कर्मचारी आणि २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. या आगीत सात जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. गेल्या २० वर्षांतील सर्वात मोठी घटना आहे. धुरामुळे श्वास कोंडून २५ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाचे संचालक खिरुदीन द्रहमन यांनी ‘एएफपी’ला दिली.