मालदीवमध्ये माजी अध्यक्ष महंमद नाशीद यांना दहशतवादविरोधी आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २०१२ मध्ये एका न्यायाधीशाच्या अटकेचे आदेश त्यांनी दिले होते, त्यामुळे हिंसाचार झाला होता.
नाशीद हे देशातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले नेते असून त्यांना जानेवारी २०१२ मध्ये न्यायाधीश अब्दुल्ला महंमद यांना अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. फौजदारी न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले असून ते फरार होण्याची भीती व्यक्त केली आहे. या प्रकरणी पहिली सुनावणी सोमवारी होणार आहे. नाशीद यांनी माले येथील भारतीय उच्चायुक्तालयात आश्रय घेतल्याची घटना फेब्रुवारी २०१३ मध्ये घडली होती. माजी अध्यक्ष नाशीद यांना धुनीधो तुरूंगात हलवण्यात आले आहे.  
मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष अली वाहिद यांनाही पोलिसांनी अटक केली असल्याचे ‘मिनीव्हॅन न्यूज’ ने म्हटले आहे. २००८ मध्ये नाशीद लोकशाही मार्गाने निवडून आले होते. फेब्रुवारी २०१२ मध्ये आपल्याला सत्ता सोडायला लावली व पोलिस, सैनिकांनी बंड केले, असा आरोप त्यांनी केला होता.