छोटय़ा पडद्यावर अर्थात दूरदर्शनवर गाजलेली आर. के. नारायणन यांच्या लेखणीतून साकार झालेली ‘मालगुडी डेज’ ही दर्जेदार गोष्टींची मालिका आता रेखाचित्ररूपाने रसिकांच्या समोर येत आहे.
लावण्या नायडू यांनी ही रेखाचित्रे काढली आहेत. नारायणन यांच्या ‘स्वामी आणि त्याचे मित्र’ कादंबरीवर आधारलेल्या ‘मालगुडी स्कूलडेज’ मालिकेनंतर हा रेखाचित्रावर आधारित पुस्तक येत आहे.
नारायणन यांच्यासारख्या महान लेखकाच्या प्रतिभेतून साकारलेल्या व्यक्तिचित्रांनी अनेकांच्या मनावर भुरळ घातली. स्वामी हा शाळकरी मुलगा आणि त्याच्या मित्रांच्या कहाण्या म्हणजे मनोरंजनाचा खजानाच होता, अशी प्रतिक्रिया ‘पफिन बुक्स’च्या प्रकाशकाने व्यक्त केली.
स्वामीचा दिवस त्याच्या खोडय़ांनी भरलेला असायचा. मुले वर्गात घोकंपट्टी करत असताना स्वामी शाळेबाहेर मालगुडीच्या रस्त्यारस्त्यांवर हुंदडत असायचा. आपल्या आजीच्या कामात लुडबुड करून तिला गोंधळवून टाकण्याची पद्धत अनेकांना भावली होती. स्वदेशी नारा ऐकून प्रेरित झालेला स्वामी जेव्हा शाळेच्या काचांवर दगड फेकतो, तो क्षण तर हसवून पुरेवाट करतो.
१० ऑक्टोबर १९०६ चेन्नई (आधीचे मद्रास) येथे जन्मलेल्या नारायणन यांनी १९३५ साली ‘स्वामी आणि त्याचे मित्र’ या कथेच्या लिखाणास आरंभ केला. मालगुडी हे गाव नारायणन यांच्या कल्पनेतील निर्मिती आहे. यातील पात्रे अस्सल वाटतात. स्वत:ची ओळख घेऊनच वाचकांसमोर येतात. अस्सल विनोदाचा निर्माता, वागण्यातील विरोधाभास, वास्तवता आणि सौंदर्य याचबरोबर कलात्मकता या गुणांनी गच्च भरलेले नारायणन यांचे लिखाण वाचकाला समृद्ध करणारे आहे. ‘स्वामी’मधील साऱ्या कथांना साधीसोपी भाषा, नर्मविनोदाचा साज होता. जग झपाटय़ाने बदलत असताना आपल्या भोळ्याभाबडय़ा विश्वात रमणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कथा नारायणन यांनी तितक्याच तन्मयतेने सांगितली, असेही प्रकाशक पुढे म्हणतात. लावण्या या कोलकाता येथून अ‍ॅनिमेशन आणि रेखाचित्रकार म्हणून नावारूपास आल्या आहेत. त्यांच्या कलेची वेगळीच डूब ‘मालगुडी डेज’ला मिळाली आहे.

क्रिकेटचा हरलेला संघ
स्वामी गावातील आपल्या मुलांना गोळा क्रिकेटचा संघ तयार करतो, पण ज्या दिवशी क्रिकेटचा सामना होणार असतो, तेव्हाच स्वामी गायब होतो. त्यामुळे त्याचे साथीदार चिंतीत होतात. खरेतर स्वामी रस्ता चुकून एका गावातून दुसऱ्या गावात आलेला असतो. गावात पोहोचेपर्यंत त्यांचा संघ मोठय़ा माणसांच्या संघाकडून पराभूत होतो. हा क्षणही लावण्या नायडू यांनी रेखाचित्ररुपाने हुबेहूब साकारला आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी