मोबाइलवर ‘आपले आपण आपणासी’ टिपण्याच्या छंदापायी एका तरुणाने आपला जीव गमावला.
मेक्सिकोतील ऑस्कर ऑटेरो अ‍ॅग्युल्र या २१ वर्षांच्या तरुणाने आपल्या ‘फेसबुक पेज’साठी आगळीवेगळी ‘सेल्फी’ टिपण्याचा निर्धार केला होता. त्याने एक गन स्वत:च्याच डोक्याला लावून स्वत:चे छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र गनमधून गोळी सुटून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण वाटेतच त्याचा अंत ओढवला.
ऑस्करचे ‘फेसबुक पेज’ त्याच्या अनेक सेल्फींनीच भरले आहे. अनेक मोटारींबरोबरची तसेच मैत्रिणींबरोबरची छायाचित्रे त्यात आहेत, असे ‘द हफिंग्टन पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे. ऑस्करने अंगाशी येणारा निर्णय का घेतला हे कळायला मार्ग नाही, असे मत एका नेटिझनने व्यक्त केले आहे.