देशातील विविध राज्यांमध्ये आज(गुरूवारी) लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीसुद्धा आसाममधील गुवाहाटी येथे आपला मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यादेखील त्यांच्यासमवेत होत्या.
यावेळी त्यांना नरेंद्र मोदींविषयी विचारले असता, देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळला. मोदींची लाट ही केवळ माध्यमांची निर्मिती असल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागेल अशी शक्यतासुद्धा त्यांनी फेटाळून लावली. गुवाहाटीच्या दिसपूर येथील सरकारी शाळेमधील मतदान केंद्रामध्ये सिंग यांना सपत्नीक मतदान केले.