पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी एकाच वेळी भारतासह विविध देशांचे १०४ उपग्रह अंतराळात यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. मंगळयान मोहिमेनंतर इस्त्रोने हा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. इस्त्रोने आतापर्यंत अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत, असे सांगून त्यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक केले. आपल्या शास्त्रज्ञांनी देशाची मान जगासमोर अभिमानाने उंचावली आहे, असे ते म्हणाले.

‘मन की बात’च्या सुरुवातीलाच सणोत्सवांबाबत बोलताना मोदींनी वसंत पंचमी, महाशिवरात्री आणि होळीचा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरतो, असे सांगून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. इस्रोच्या पीएसएलव्ही सी-३७ या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे जगातील अनेक देशांचे लक्ष लागले होते. अखेर आपल्या लौकिकाला जागत इस्रोने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखविली. या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले.

LIVE UPDATES:

– पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशवासियांशी संवाद

– ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो – पंतप्रधान मोदी

-डिजि-धन आणि लकी ग्राहक योजनेला मोठा प्रतिसाद

-डिजिटल पेमेंट करण्याकडे लोकांचा कल वाढतोय

-१० लाखांहून अधिक लोकांना या योजनेंतर्गत बक्षिसे मिळाली

-डिजि-धन योजनेबाबत लोक जागृती करत आहेत.

-देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान

-गावांतून शहरांना ताकद मिळत आहे

-यावर्षी विक्रमी पीक उत्पादन

-शेतकऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

– स्वच्छतेबाबत सर्वच जण जागरुक- मोदी

– हैदराबादमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनीही कौतुकास्पद कामगिरी केली आहे

-अंधांच्या टी-२० संघातील खेळाडूंनी देशाची मान उंचावली, पंतप्रधानांकडून कौतुक

-मुलींबाबत विचारांत बदल होत आहे. तामिळनाडूत अनेक बालविवाह रोखले

-महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत