व्यावसायिक नेटवर्किंग साईट्सच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘लिंक्डइन’ ‘मायक्रोसॉफ्ट’ने विकत घेतली. २६ अब्ज डॉलरमध्ये झालेल्या या व्यवहाराला दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. सोशल नेटवर्किंग कंपन्यांच्या विश्वातील हा एक मोठा व्यवहार समजला जातो.
लिंक्डइनवर सध्या ४३.३ कोटी यूजर्स असून, विविध क्षेत्रातील व्यावसायिक नेटवर्किंगसाठी या वेबसाईटचा वापर करतात. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारानुसार लिंक्डइनच्या प्रत्येक शेअरला १९६ डॉलर इतका भाव मिळाला आहे. गेल्या शुक्रवारी या कंपनीचे शेअरचे भाव १३१.०८ वर बंद झाले होते.
लिंक्डइन ही आता मायक्रोसॉफ्टच्या समूहातील एक कंपनी झाली असून, तिचे सीईओ जेफ विनर यापुढे सत्या नाडेला यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.