येत्या रविवारी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची शासकीय पातळीवरून जोरदार तयारी सुरू आहे. रविवारी सकाळी राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमास खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहणार आहेत.
योग दिनानिमित्ताने विविध राज्यांतही खास समारंभ आयोजित करण्यात आले असून, केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना तेथे उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. काही मंत्री आणि ते उपस्थित राहणार असलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे : नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू – चेन्नई, पर्यटनमंत्री महेश शर्मा – नोईडा, कायदामंत्री डी. व्ही. सदानंद गौडा – तिरुवनंतपुरम, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा – हैदराबाद, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर – मीरत, महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी – पिलभित, आदिवासी विकासमंत्री जुआल ओराम – जेपोर (ओडिशा), माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड – दिल्ली, मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी – शिमला. पीटीआय, नवी दिल्ली
येत्या रविवारी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची शासकीय पातळीवरून जोरदार तयारी सुरू आहे. रविवारी सकाळी राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमास खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमास परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहणार आहेत.
योग दिनानिमित्ताने विविध राज्यांतही खास समारंभ आयोजित करण्यात आले असून, केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना तेथे उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. काही मंत्री आणि ते उपस्थित राहणार असलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे : नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू – चेन्नई, पर्यटनमंत्री महेश शर्मा – नोईडा, कायदामंत्री डी. व्ही. सदानंद गौडा – तिरुवनंतपुरम, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा – हैदराबाद, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर – मीरत, महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी – पिलभित, आदिवासी विकासमंत्री जुआल ओराम – जेपोर (ओडिशा), माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड – दिल्ली, मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी – शिमला.