पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेल्या सलमानवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी निशाणा साधला. सलमान खानची ट्युबलाईट मधेमधे पेटत असते. अशा भाष्त राज यांनी सलमानचा समाचार घेतला. ‘टाइम्सनाऊ’  या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचे समर्थन करणाऱ्या सलमानला सुनावले. सीमारेषेवर तैनात जवान छातीवर झेलत असणाऱ्या गोळ्या या फिल्मी नसतात,असे सांगत सलमानला त्यांनी फटकारले. ‘भारतीय जवानांना गोळ्या लागतात त्या फिल्मी नसतात, तर त्या खऱ्या असतात आणि सलमान खानला ज्या गोळ्या लागतात त्या खोट्या असतात.’ असे राज यांनी म्हटले.

स्वत: कलाकार असल्याचे सांगत यावेळी राज यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या मानसिकतेचा पाढा देखील वाचून दाखविला. मनसेच्या भीतीने मायदेशी परतलेल्या एकाही पाकिस्तानी कलाकाराने उरी हल्ल्याचा निषेध नोंदविला नसल्याचेही राज म्हटले. भारतीय क्रिकेट संघचा कर्णधार महेंद्रस्रिग धोनी याच्या आयुष्‍यावर आधारित ‘एम एस धोनी द अन टोल्‍ड स्‍टोरी’ या चित्रपटावर पाकिस्‍तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या वृत्ताची खातरजमा करत पाकिस्तानी कलाकारांवर घालण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी समर्थन केले.

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यासाठी’अल्टिमेटम’ दिले होते. त्यानंतर इंडियन पिक्सचर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने (इम्पा) देखील पाकिस्तानी कलाकार, गायक यांना यापुढे हिंदी चित्रपटामध्ये काम न देण्याचा निर्णय घेतला होता. यापार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खान याने पाकिस्तान कलाकारांना पाठींबा दिला. सलमानच्या या भूमिकेमूळे त्याच्यावर टीकेचा भडीमार होत असताना राज ठाकरेंनी सलमान खानवर हल्लाबोल केला.