मोबाइल अ‍ॅपच्या वापरामुळे शिशुवर्गातील मुले साक्षरता कौशल्ये लवकर शिकतात व शाळेत जाण्यासाठीची त्यांची पूर्वतयारी शिशुवर्गात अ‍ॅप वापरल्याने चांगली होते असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
न्यूयॉर्क विद्यापीठाच्या बालपण व साक्षरता शिक्षण या विभागाच्या प्राध्यापक सुसान न्यूमन यांनी सांगितले की, मोबाइल अ‍ॅप्सच्या मार्गदर्शनाखाली वापर केला, तर ते मुलांना एखादी कृती करण्यास उद्युक्त करतात. प्रेरणात्मक हेतूने तयार केलेले अ‍ॅप्स मुलांना खरोखर शिक्षणास प्रवृत्त करू शकतात.
या अभ्यासात संशोधकांनी शैक्षणिक अ‍ॅप्सचा (उपयोजने) उपयोग शिक्षणासाठी कसा होतो हे तपासले. लर्न विथ होमर या अ‍ॅपचा उपयोग कमी उत्पन्न गटातील शाळकरी मुलांवर करण्यात आला. त्यात त्यांची शाळेत जाण्यापूर्वीची तयारी करून घेण्याचा हेतू होता. आयपॉडच्या मदतीने मुलांना विशिष्ट अ‍ॅप्स देण्यात आले त्यात शब्द, आवाज व गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन यांचा समावेश होता. १० वर्गातील १४८ शिशुवर्गातील मुलांच्या संदर्भात हा प्रयोग करण्यात आला. साक्षरतापूर्व अनेक चाचण्या त्यात करण्यात आल्या व संशोधकांनी मुलांचे ध्वनी ज्ञान, लर्न विथ होमर या अ‍ॅप्समधील संकल्पनांचा प्रत्यक्ष वापर या गोष्टी तपासल्या. त्या दुसऱ्या एका अ‍ॅपच्या संदर्भातील मुलांशी तुलनात्मक पध्दतीने तपासण्यात आल्या. उच्चार व ध्वनीबद्दल समज यामुळे शब्दांची समज दृढ होते व नंतर वाचनक्षमता तपासली जाते.
संशोधकांच्या मते या अ‍ॅप्सच्या मदतीने मुलांचे उच्चार व ध्वनी ज्ञान वाढले व संभाषणाचा अर्थ समजण्याची व छापील शब्द ‘लर्न विथ होमर’ या अ‍ॅपने समजावून घेण्याची क्षमता वाढली. त्यांची तुलना कला व कार्यकुशलता याच्याशी संबंधित दुसऱ्या अ‍ॅपचा वापर करणाऱ्या मुलांशी करण्यात आली. छापील संकल्पना समजण्यातही दोन अ‍ॅपचा वापर करणाऱ्या गटांमध्ये फरक दिसून आला. शिकागो येथील अमेरिकन एज्युकेशन रीसर्च असोसिएशन या संस्थेने याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले आहे.

‘लर्न विथ होमर’ ची भारतीय आवृत्ती हवी
लर्न विथ होमर हे अमेरिकेत तयार करण्यात आलेले अ‍ॅप असून त्यात २२ पातळ्यांवर १००० धडे व कृती तीन ते आठ वयोगटातील मुलांना शिकवल्या जातात. तो एक प्रकारे अमेरिकेतील मुलांना साक्षर करणारा आज्ञावली कार्यक्रम आहे. आयपॉडवर ते चालवता येतो. त्यात लोककथा, बडबडगीते व साहसकथा आहेत. १० लाख मुलांना त्याचा फायदा  झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण हे अ‍ॅप भारतीय मुलांना जसेच्या तसे उपयोगी पडणार नाही त्यामुळे अ‍ॅप विकसकांनी आणखी वेगळ्या कल्पना लढवून भारतीय मुलांसाठी नवे ऑप तयार करावे. त्याला भारतीय लोककथा, संगीत, कविता यांचा बाज द्यावा लागेल. हे अ‍ॅप प्रादेशिक भाषेतही आणता येईल त्यात नवीन कल्पनांची भर टाकता येईल.

Pooja sawant shared honeymoon photos from a trip with her husband siddhesh chavan
हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…”
Teacher Eligibility Test by Maharashtra State Examination Council To be taken offline Pune news
टीईटी परीक्षेबाबत झाला मोठा निर्णय… जाणून घ्या होणार काय…
शैक्षणिक अ‍ॅप
गतिमान काळातील कुटुंब संस्था