गुजरात सरकारमधील भ्रष्टाचाराबाबत कॅगने दिलेले अहवाल आणि प्रसारमाध्यमांतील बातम्या यांतून मोदी सरकार राज्यात कशी हेराफेरी करत आहे हे दिसून येते, असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी येथे केला.
सिद्धपूर येथे झालेल्या रॅलीत सोनिया म्हणाल्या, ‘गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार पसरला आहे. केंद्र सरकारकडून नियमितपणे वीजपुरवठा होत असताना गुजरातमधील साडेचार लाख शेतकऱ्यांना अजूनही वीजजोडणी का मिळालेली नाही. शिक्षण क्षेत्राची वाताहत झाली आहे, तर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांनी जनतेला बेजार केले आहे. गुजरातमधील हे चित्र बदलले पाहिजे व ते पुन्हा विकासाच्या वाटेवर आणले पाहिजे.’