चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांचे अहमदाबादमध्ये १७ सप्टेंबर रोजी स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जिनपिंग यांच्या भारतभेटीमुळे भारत आणि चीनमधील संबंध अधिकाधिक दृढ होतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे.
गुजरातला बौद्धधर्माचा वारसा असून त्याबाबतची माहिती मोदी यांनी ट्विटरवर टाकली आहे. आपण ज्या ठिकाणी जन्मलो त्या वडनगरलाही बौद्धधर्माचा वारसा आहे, असेही ट्विट करण्यात आले आहे.झी जिनपिंग यांच्या सन्मानार्थ मोदी यांनी साबरमती येथे खासगी प्रीतिभोजनही आयोजित केले आहे. या प्रीतिभोजनाला दोन्हीकडील निवडक निमंत्रितच म्हणजेच प्रत्येकी पाच जणच उपस्थित राहणार आहेत