सर्वाना बरोबर घेऊन जाणारा समाज निर्माण करून आपल्याला जगापुढे आदर्श निर्माण करायचा आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सेवा भारतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी बंधुभाव जोपासणारा समाज निर्माण करण्यावर भर दिला.
संघटितरीत्या व शिस्तबद्धरीत्या काम वाढवण्याची गरज आहे. ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्यायला हवी. मदत करताना कोणताही हेतू नको. मग त्यात हा संघ स्वयंसेवक आहे की नाही, हिंदू आहे की नाही याचा विचार मनात नको अशी आमची धारणा आहे. मदतीतून आपल्याला मोबदला काय मिळेल याची इच्छा बाळगता कामा नये असे भागवत यांनी स्पष्ट केले.  एखाद्याला आमिष दाखवण्याच्या हेतूने सेवा करता कामा नये तर ते कर्तव्य भावनेने हवे.
विप्रोचे अझीम प्रेमजी हे या वेळी उपस्थित होते. मी काही राजकीय व्यक्ती नाही किंवा एखाद्या विचारसरणीला पूर्ण बांधील नाही. मतभिन्नता असली तरी चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.