भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मोठा दिलासा दिला आहे. वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांना निवडणूक लढवता येऊ शकते, असे शहांनी त्यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटले. ‘निवडणूक लढवणाऱ्या कोणालाही रोखण्याची परंपरा आमच्या पक्षात नाही,’ असे शहा यांनी पत्रकारांना सांगितले. शहा यांच्या या विधानामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.

‘वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नाही, असा कोणताही नियम पक्षात नाही, असे शहांनी म्हटले. अमित शहांच्या या विधानामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांची निवड करताना वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना स्थान दिले नव्हते. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. शहा यांच्या नव्या विधानामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत आणि त्याआधी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळू शकते.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
bjp royal family members ticket
Video: ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या आनंदीबेन पाटील यांनी वय वाढल्याने राजीनामा दिला होता. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पटेल यांनी वय वाढल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. मात्र आता शहांच्या नव्या विधानाचा फायदा पक्षातील अनेक नेत्यांना होणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे वय ७४ वर्षे आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून इंदूरच्या खासदार आहेत. शहांनी ज्येष्ठ नेते निवडणूक लढवू शकतात, असे म्हटल्याने महाजन यांना २०१९ मध्ये संधी मिळू शकते.

हिमाचल प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी राज्यात भाजपला एका अनुभवी चेहऱ्याची आवश्यकता आहे. शहांच्या नव्या विधानामुळे या ठिकाणी ८२ वर्षीय शांता कुमार यांना मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद मिळू शकते. कर्नाटकात भाजप बी.एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवणार आहे. त्यांचे वयदेखील ७५ वर्षांपेक्षा अधिक आहे. शहांच्या नव्या विधानामुळे त्यांचाही रस्ता मोकळा झाला आहे.