पाँन्टी चड्डा यांची आज(शनिवार) दिल्लीत गोळी झाडून हत्या करण्यात आली . पाँन्टी चड्डा आणि हरदीप चढ्ढा या दोघा भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता.  हा वाद मिटवण्याच्या उद्देशाने  संपत्तीवाटपाची दिल्लीत पाँन्टी चढ्ढा यांच्या फार्म-हाऊसवर बैठक घेण्यात आली होती. पण याबैठकी दरम्यान वाद आणखीन चिघळ्याने हरदिप चड्डा आणि पाँन्टी चढ्ढा यांनी एकमेकांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि यात पाँन्टी चढ्ढा व हरदिप चढ्ढा या दोघांचा मृत्यू  झाला. तसेच प्रसंगी उपस्थित असलेले सुरक्षारक्षक देखील जखमी झाले आहेत. चढ्ढा यांच्या कंपन्यांचा दिल्ली, हिमाचल, उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये सुमारे २५०० कोटींचा व्यवसाय आहे. ‘व्हेव’ नावाची कंपनी सुरू करत चढ्ढा यांनी मद्य व्यवसायाला सुरूवात केली होती आणि अवघ्या काही वर्षातच चढ्ढा यांनी कोट्यावधींची संपत्ती प्राप्त केली होती.