अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याविरोधात खटला

पोलीस अधिकाऱ्याने बळजबरीने आपल्याला हिजाब उतरवून आपले छायाचित्र घेत आपल्याला ‘खोटी अटक’ करण्यात आली असल्याचा आरोप करीत रबाब मुसा (३४ ) या महिलेने मॅनहॅटन सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. या महिलेने आपल्याला मागील सप्टेंबर महिन्यात बेकायदेशीररीत्या अटक केल्याचे म्हटले आहे. आपला हिजाब उतरविण्यास लावून जप्त करण्यात आला. त्यानंतर मिडटाऊन पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी आपली छायाचित्रे काढली असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.

महिलेला एका पुरुषासोबत कोठडीत ठेवण्यात आले व सहा तासांनंतर कोणताही गुन्हा दाखल न करता सोडण्यात आले. न्याय विभाग या खटल्याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.

३८ वर्षीय हिजाब परिधान करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याने न्यूयॉर्क पोलीस दलाविरुद्ध  खटला दाखल केल्यानंतर सदर प्रकरण उजेडात आले. आपल्याला सहअधिकाऱ्यांकडून आतंकवादी व तालिबानी म्हणून हिणविण्यात येत असल्याचा आरोप या महिला अधिकाऱ्याने केला होता.