जनगणना अहवालाच्या माध्यमातून देशातील भिकाऱ्यांची संख्या समोर आली आहे. या अहवालात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि अन्य धर्मातील भिकाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. देशातील ७२.८९ कोटी जनता ही निष्क्रीय असल्याचे या अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ असा नव्हे की, देशातील इतकी जनता खरोखरीच काही काम करत नाही. जे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत नाहीत अशांची काम न करणाऱ्यांमध्ये वर्णी लागते.
आकडे काय सांगतात – २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत भिकाऱ्यांच्या संख्येत आता घट झाली असून, देशासाठी ही चांगली बाब आहे. २००१ मध्ये जिथे ६.३ लाख भिकारी होते, तिथे या आकड्यांमध्ये ४१ टक्के घट येऊन हा आकडा ३.७ लाखावर आला आहे.
भीक मागणे गुन्हा – भीक मागणे हा भारतात गुन्हा आहे. यासाठी तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. परंतु, कोणाला भिकारी म्हणावे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक राज्यात बेघर, मजूर आणि स्थलांतरितांना या वर्गवारीत ठेवण्यात येते असून यावर अद्याप सहमती झालेली नाही.