नागालँडमध्ये तामिळनाडूसारखी परिस्थिती होताना दिसत आहे. इथे सत्ताधारी पक्ष नागालँड पीपल्स फ्रंटच्या (एनपीएफ) ४० आमदारांनी मुख्यमंत्री टी. आर. जीलँग यांना हटवण्याची मागणी करत आहेत. इतकंच नव्हे तर या आमदारांनी विरोध करत शेजारील राज्य आसामच्या काझिरंगा नॅशनल पार्कमधील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी गेले आहेत. जी जीलँग यांना हटवून त्यांच्याऐवजी नाईफ्यू रियो यांना मुख्यमंत्री बनवण्याची त्यांनी मागणी केली आहे. खासदार नाईफ्यू रियो हे नागालँडचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना मागील वर्षी एनपीएफ पक्षातून काढण्यात आले होते. ते शनिवारी रात्री सर्व आमदारांना भेटण्यासाठी काझिरंगा पार्कला गेले होते. या सर्व आमदारांनी रियो यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्याची मागणी करत आहेत. ६० आमदारांच्या या विधानसभेत विरोधी पक्षच नाही. सर्वच्या सर्व आमदार हे डेमोक्रॅटिक अलाइन्स ऑफ नागालँड (डीएएन) आघाडीचे आहेत. यामध्ये ४९ आमदार हे एनपीएफ, ४ भाजप आणि सात अपक्ष आमदार आहेत.

सुमारे ४० आमदारांना जीलँग यांच्या कामाची पद्धत रूचलेली नाही. परंतु, नागालँडमध्ये शहरी स्थानिक निवडणुकांमध्ये महिलांचे आरक्षण वाढवण्याची मागणी समोर आली होती. या विरोधात झालेले आंदोलन जीलँग यांना व्यवस्थित हाताळता आले नव्हते. त्यामुळे राज्यात मोठा हिंसाचार झाला. यावरून आमदार नाराज आहेत.
सर्व आमदार शुक्रवारी काझिरंगा रिसॉर्टवर पोहोचले होते. त्यांनी शनिवारी सुमारे ७ तास बैठक घेतली होती. त्यानंतर जीलँग यांना हटवून रियो यांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. आमदारांनी एनपीएफचे अध्यक्ष शूरहोजीली यांना पत्र लिहून मे २०१६ मध्ये पक्षातून निलंबित करण्यात आले होते. आता त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले आहे. पक्षविरोधात कारवाया केल्याचा रियो यांच्यावर आरोप होता.