लोकसभेतील प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद; पटोलेंची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

लोकसभेत सादर होणारया ज्या खासगी प्रस्तावावरून शुRवार विधानपरिषदेचे कामकाज राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडले, तो भाजपचे भंडारा- गोंदियाचे खासदार नानासाहेब पटोले यांचा वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा खासगी प्रस्ताव लोकसभेमध्ये अखेर सादर झालाच नाही!

Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”
In the first list of candidates announced by Sharad Pawar faction of NCP Nilesh Lanke from Nagar Lok Sabha Constituency has been included
शरद पवार-नीलेश लंके यांनी ठरवून केलेली खेळी की निव्वळ योग? राजीनामा आणि लगेचच उमेदवारीच्या पहिल्याच यादीत स्थान

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेले पटोले हे वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे ठाम पुरस्कर्ते आहेत. त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा खासगी प्रस्ताव सादर केला होता. शुRवारच्या कामकाजात त्याची नोंदही (लिस्ट) झाली होती. मात्र, तो प्रत्यक्षात सादर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तो मुद्दा उचलला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे दुसरे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेला टोमणे मारले आणि सरतेशेवटी कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले. पण ज्या प्रस्तावाच्या ‘प्रस्तावा’वरून एवढा गदारोळ झाला, तो खासगी प्रस्ताव दिवसाअखेरपर्यंत लोकसभेत मांडलाच गेला नाही. आता आलाच तर तो १२ ऑगस्टरोजी येण्याची शक्यता आहे. पण तो पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.

यावरून पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. ‘माझी भूमिका स्पष्ट आहे, पण राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी. त्यांचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी वेगळ्या विदर्भाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

त्यांचे विदर्भातील बहुतेक नेते वेगळ्या राज्याच्या मागणीला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे माझा राजीनामा मागणारयांनी अगोदर प्रफुल्ल पटेलांचा राजीनामा मागण्याची हिंमत दाखवावी अशी मागणी केली.

यापूर्वीही प्रस्ताव व खासगी विधेयक..

पटोले यांचा प्रस्ताव जरी शुक्रवारी लोकसभेत सादर झाला असता तरी तो काही वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा पहिला प्रस्ताव नाही. यापूर्वी सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहीर, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी खासगी विधेयक सादर केलेले आहे. तेव्हा त्यावरून गोंधळ झालेला नव्हता.