स्वित्र्झलडमधून काळा पैसा मायदेशी आणण्याचे स्वप्न असले तरीही आमच्या जन्मात हा पैसा परत येईल असे वाटत नाही, अशा शब्दात गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरबोलताना दुबे यांनी हे शालजोडीतले बोल सरकारला सुनावले आहेत.