अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प Melania trump यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narenda Modi यांचे व्हाईट हाऊसमध्ये जोरदार स्वागत केले. मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यानंतर स्वतः ट्रम्प यांनी त्यांची पत्नी मेलानिया यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागताने भारावून गेलेल्या मोदींनीही ट्रम्प दाम्पत्याचे आभार मानले. इतकंच नव्हे तर मोदींनी ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचे निमंत्रण दिले. मोदींनी ट्रम्प यांनी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांना खास गिफ्ट दिले. एएनआयच्या वृत्तानुसार, मोदी यांनी मेलानिया यांना काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये तयार करण्यात आलेल्या शाल भेट दिल्या. तसेच कांगडा खोऱ्यातील कारागिरांनी तयार केलेले चांदीचे ब्रेसलेट आणि चहापावडरही भेट दिली.

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर १९६५ मध्ये प्रसिद्ध केलेला एक पोस्टल स्टॅम्पही भेट दिला. तसेच पंजाबमधील होशियारपूरमध्ये तयार केलेली खास लाकडाची पेटीही भेट दिली. तत्पूर्वी, व्हाईट हाऊसमध्ये जाण्यापूर्वी ट्रम्प दाम्पत्याने मोदींशी चर्चा केली तसेच परस्परांबद्दल विचारपूस केली. मोदींशी चर्चा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत. भारत खूप चांगले काम करत असून एका देशाच्या महान पंतप्रधानांचे स्वागत करणे माझ्यासाठी सन्मान आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले.