19 September 2017

News Flash

मोदी सरकारच्या बाहूत बळ..

न्यायासाठी पहिले पाऊल

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: May 19, 2017 3:15 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकिस्तानला सणसणीत चपराक देण्यामध्ये भारताला यश आल्याने तिसऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारची छाती आणखीनच फुगली. पण त्याच वेळी नव्या कुरापती काढल्याशिवाय पाक गप्प बसणार नसल्याची खात्री असल्याने अतिसावधानता बाळगावी लागण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

एका अर्थाने काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका स्वीकारून कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला होता. निकाल विरोधात गेला असता तर आणखी तीव्र टीकेला सामोरे जाण्याचा धोका होता.

तसेच अगोदरच काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्याचे दडपण असताना जाधव प्रकरणातील प्रतिकूल निर्णयाचा विपरीत परिणाम काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीवर झाला असता.

सुदैवाने निकाल भारताच्या बाजूने लागल्याने मोदी सरकारवरील दडपण कमी झाले आणि दुसरीकडे पाकची कोंडी आणि नाचक्की झाली. त्यामुळे २६ मे रोजी सरकारचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारचे व भाजपचे बाहू चांगलेच फुरफुरणार आहेत.

तरीही भीती या कुरापतींची..

सणसणीत चपराक बसल्यानंतर गप्प बसण्याऐवजी पाक आणखी कुरापती काढण्याची शक्यता अनेकांना वाटते आहे. त्यापकी भीती पुढील काही शक्यतांची..

 • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखवून जाधव यांना फाशीवर चढविण्याचा टोकाचा निर्णय पाक घेऊ शकतो. यापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या तीनही निकालांना धाब्यावर बसवून अमेरिकेने फाशी दाखले आहेत. पण इतके टोक गाठण्याचा धोका पाक कितपत स्वीकारेल? तसे केल्यास राष्ट्रसंघाकडून आíथक र्निबध आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रतिमाहनन होईल.
 • या निकालाविरोधात राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद आणि नंतर सर्वसाधारण सभेचे दरवाजे पाक ठोठावू शकते. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निर्णयास बराच काळ अपेक्षित आहे.
 • काहींच्या मते, पाक तुरुंगामध्ये कैद्यांमध्ये हाणामारी घडवून कुलभूषण जाधव यांची हत्या घडवून आणण्याचाही कट रचला जाऊ शकतो.
 • आंतरराष्ट्रीय दबावामुळे फाशी देता आली नाही तर पाककडून जाधव यांचा कोठडीमध्ये अनन्वित छळ केला जाण्याची भीती बहुतेकांना वाटते.
 • याशिवाय सीमेवरील कुरापती वाढविणे, आणखी दहशतवाद्यांना घुसविण्यासारख्या कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

न्यायासाठी पहिले पाऊल

दरम्यान, न्यायालयाने पाकला दिलेली सणसणीत चपराक ही जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले, ’हा निकाल अत्यंत स्पष्ट आणि पूर्णपणे एकमताने दिला आहे. अंतिम निकाल येईपर्यंत जाधव सुरक्षित राहू शकतात. कारण हा आदेश पाकवर बंधनकारक आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास आंतरराष्ट्रीय र्निबधांना त्यांना सामोरे जावे लागेल.’

 

First Published on May 19, 2017 3:15 am

Web Title: narendra modi marathi articles
 1. विकास मदने
  May 19, 2017 at 8:05 am
  समजा दाउदला भारताने फाशी दिली अन पाक आंतराट्रीय न्ययलयात गेला तर आं. न्यायालय नक्की भारतालाही फटकारनार त्याच ते कामाच आहे. यात मूत्सद्देगिरी वगैरे काहि नाही.
  Reply
  1. K
   k bansidhar
   May 19, 2017 at 8:05 am
   मोदी यांच्या बहुत बळ मिळणारच आहे मग त्याला तुमच्यासारख्या भ्रष्ट,गुंड,जे भ्रष्ट,गुंड कॉंग्रेसच्या थैल्या/कोंबड्या याच्या प्रभावाखाली सतत लिहित,बोलत असतात त्यांना वाटत असते कि राज्य/राष्ट्रातील लोकशाही आपल्याच खाद्यावर आहे व राष्तारतील/राज्यातील सामान्य लोक मूर्ख आहेत.हे म्हणजे असे झाले कि बैल ी खाली चालणार्या श्वानाला वाटत असते कि बैल ी आपणच हाकत आहोत व बैल नुसतेच बरोबर चालत आहेत.हेच पहा आपल्याला श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोल शास्त्रात केलेल्या कार्यावर दहा लाख डोल्लार्स चा पुरस्कार मिळाला आहे हि गौरवास्पद बातमी आपल्याकडे प्रसिद्धीसाठी नाहीच पण अन्य फालतू खोट्या बातम्या देवून पांढरा कागद केवळ कला करून आपले पोट/खिसे भरण्याचे पवित्र कार्य केले आहेत.अर्थात याला देखील आपण दडपणार आहात.अर्थात कॉन्ग्रेस्स्भ्रष्टीत मध्य्माकडून दुसरी अपेक्षा नाही.
   Reply
   1. A
    arun
    May 19, 2017 at 7:45 am
    ही स्थगिती आहे. आता पाकिस्तान-भारत यांच्यातच सुनावणी झाली. काही महिन्यांनी जेव्हा खटला परत सुरु होईल तेव्हा त्यात निर्णयाला अंतरराष्ट्रीय दाबाचे कंगोरे असतील. हेग न्यायालयाने सावरकराना असाच दगा एकदा दिलेला आहे. इंग्रजांच्या दबावामुळे, फ्रान्समध्ये पकडले गेले, हेगमध्ये खटला चालला तरी न्याय्य न्याय मिळाला नाही. तेच आतासुद्धा घडण्याची शक्यता असेल. यापुढच्या खटल्यात सरकारची जबाबदारी आणि यश यांची परीक्षा आहे.
    Reply
    1. उर्मिला.अशोक.शहा
     May 19, 2017 at 7:38 am
     vande mataram- mr editor why you have not mention incompeetance of congress of it's sixty long years? while hand pak issues jagate raho
     Reply
     1. P
      Prashant
      May 19, 2017 at 6:38 am
      आम्हाला वाटले होते कि जाधव प्रकरणात संपूर्ण भारत एक असेल आणि निदान यात तरी कोणाला राजकारण सुचणार नाही. पण इकडे देखील तुमची प्रेश्यागिरी सुरूच दिसत्ये. असेच करत राहा.....धन्यवाद!!!!
      Reply
      1. R
       rajeshwaree
       May 19, 2017 at 6:33 am
       pak is shameless n not reliable country, they can harm kulbhushan jadhav
       Reply
       1. Load More Comments