अडीच वर्षांत ११०० कोटींची उधळपट्टी

केंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून अडीच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी जाहिरातींवर तब्बल ११०० कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याचाच अर्थ दर दिवशी मोदींच्या जाहिरातींवर एक कोटी ४० लाख रुपये खर्च होत आले आहेत. मंगळयान या मोहिमेच्या खर्चाची तुलना केल्यास मोदींच्या जाहिरातींवरील खर्च दुपटीहून जास्त आहे. मंगळयान मोहिमेचा खर्च ४५० कोटी रुपये इतका होता.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

माहिती अधिकार कार्यकर्ते रामवीर सिंग यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मोदींवरील जाहिरातींच्या खर्चाची माहिती मागवली होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडून खर्चाचा हा आकडा जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये मोदींच्या केवळ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, इंटरनेट यांमधीलच जाहिरातींचा समावेश असून मुद्रित माध्यमे, होर्डिग्ज, पोस्टर, पुस्तिका आणि कॅलेंडर अशा माध्यमांमधील जाहिरातींचा समावेश नाही. त्यांवरील खर्च जर एकत्र केला तर हा आकडा आणखी मोठा होईल. भाजपने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारवर जाहिरातबाजीवर अवाजवी खर्च करत असल्याचा आरोप केला होता. माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झालेल्या माहितीनुसार दिल्लीतील आप सरकारने दररोज जाहिरातींवर १६ लाख रुपये खर्च केले होते. २०१५ साली त्यांनी वार्षिक अर्थसंकल्पामध्ये जाहिरातींसाठी ५२६ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

या विषयावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलीम म्हणाले की, ‘सरकारी यंत्रणेचा असा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिमासंवर्धनासाठी वापर करणे हे आणीबाणीतील परिस्थितीशी मिळतेजुळते आहे.

त्यावेळी ‘इंदिरा म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंदिरा’ अशा अर्थाच्या घोषणा दिल्या जात होत्या. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए-१) २००३-०४ सालातील ‘इंडिया शायनिंग’ मोहिमेसारखीच ही मोहीमदेखील पोकळ ठरेल.’