२०१४ या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेल्या भारतीय राजकारण्यांमध्ये नरेंद्र मोदींचे नाव आघाडीवर आहे. ‘याहू इंडिया’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे मोदींचा उजवा हात समजले जाणारे अमित शहा आणि भाजप सरकारमधील मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी अरूण जेटली यांनीही मोदींखालोखाल क्रमांक पटकावला आहे. या यादीत आघाडीच्या स्थानावर असलेले राजकारणी पुढीलप्रमाणे:

modi01नरेंद्र मोदी- भारतातील राजकीय समीकरणांचा चेहरामोहरा बदलणारे नरेंद्र मोदी यांचे नाव अगदी वर्षाच्या सुरूवातीपासूनच चर्चेत होते. गोवा येथील पक्षबैठकीत अडवाणींची नाराजी पत्कारून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झाल्यापासून ते आजपर्यंत मोदी सतत ‘येन केन कारणेन’ चर्चेत राहिले आहेत. त्यामुळेच आजच्या समाजाचे प्रतिबिंब असणाऱ्या सोशल साईटसवरही नरेंद्र मोदी हे नावाच वरचष्मा दिसून येतो. ट्विटरवरदेखील नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे पंतप्रधान बराक ओबामा यांच्यानंतर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी राजकीय व्यक्ती आहेत.

amit-shah-l1-(1)अमित शहा- नरेंद्र मोदींचा उजवा हात आणि सर्वात विश्वासू सहकारी अमित शहा यांनी इंटरनेटवर सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेल्या भारतीय राजकारण्यांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शहा यांनी भाजपच्या प्रचारयंत्रणेचा कौशल्याने आणि धोरणीपणाने वापर करत पक्षाला अभुतपूर्व यश मिळवून दिले. विशेषकरून उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या ८०पैकी ७२ जागांवर भाजपला अमित शहा यांच्याच रणनीतीमुळे स्वप्नातीत विजय मिळवता आला. सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर असणारे अमित शहा यांचे नाव आगामी काळातसुद्धा चर्चेत राहील यात शंकाच नाही.

arunअरूण जेटली- लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी पडूनदेखील केवळ विद्वत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर अरूण जेटली यांच्याकडे सरकारमधील महत्त्वपूर्ण असे अर्थखाते सोपविण्यात आले. विरोधी पक्षात असताना युपीए सरकारविरोधात आरोपांची राळ उठवून देण्यात अरूण जेटली सर्वात आघाडीवर होते.

mohan
मोहन भागवत-
भारतीय राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले स्थान कोणालाही नाकारता येणे शक्यच नाही. संघ हा वेळोवेळी देशातील राजकारणावर आपला प्रभाव टाकत आला आहे. त्यामुळेच सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. अनेकदा आक्रमकपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करून संघाने भाजपला अडचणीत आणले असले तरी, संघाच्या मुशीतून घडणारे कार्यकर्ते आणि नेत्यांवर पक्षाची मदार अवलंबून आहे. हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते मोहन भागवत यांनी इतर धर्मीयांवर केलेली आगपाखड इंटरनेटवर अनेकजण आवर्जून वाचताना दिसतात.

rajराजनाथ सिंह- भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नितीन गडकरी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर दिल्लीच्या दरबारी राजकारणाची उत्तम जाण असणाऱ्या राजनाथ सिंह यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविण्यात आली. त्यानंतर राजनाथ यांनीदेखील आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता पक्षाला देदिप्यमान यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

pari1-(1)मनोहर पर्रिकर- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तसे शांत आणि संयमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. केंद्रीय संरक्षणमंत्रीपदी करण्यात आलेल्या निवडीसाठी त्यांची पक्षनिष्ठा आणि वैयक्तित जीवनातील साधेपणा हे दोन घटक अत्यंत महत्वपूर्ण ठरले आहेत. त्याशिवाय, आयआयटीसारख्या संस्थेतून घेतलेले शिक्षण ही पर्रीकरांची आणखी एक जमेची बाजू आहे.

soniaसोनिया गांधी- भारतीय राजकारणात गांधी कुटुंबाचे असलेले स्थान आजही अबाधित आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागला असला तरी, सोनिया गांधींचे गेल्या दहा वर्षातील शिताफीने राजकारण हाताळण्याचे कौशल्य नक्कीच दुर्लक्षून चालणार नाही.

suresh-prabhu-759सुरेश प्रभू- सुरेश प्रभू यांच्या राजकारणाची पद्धत आणि त्यांचा अभ्यासूपणा पाहिल्यास ते गेले कित्येक वर्षे शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेचा भाग होते, हे सांगूनही अनेकांना खरे वाटणार नाही. गेले काही वर्षे दिल्लीत प्रभू सेनेचे खासदार म्हणून वावरत असले तरी, वैचारिकतेशी दुरवरचा संबंध असणाऱ्या शिवसेनेने त्यांना जवळपास वाळीतच टाकले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरेश प्रभू भाजपवासी झाले आणि त्यांच्यावर रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. कमालीची विद्वता आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर येणाऱ्या काळात ते रेल्वेमंत्रालयात आमुलाग्र बदल घडवून आणतील अशी अनेकांना अपेक्षा आहे.

ram-madhav_mराम माधव- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते राम माधव हेदेखील यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना चर्चेसाठी भाजपचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. त्यांनी पाकिस्तानचे दरवाजे न ठोठावता भारतीय पंतप्रधानांकडे दाद मागावी, या विधानामुळे राम माधव मध्यंतरी चर्चेत होते. भारतीय राजकारणातील संघाचा प्रभाव अधोरेखित करणारे आणखी एक उदाहरण म्हणून राम माधव यांच्याकडे पाहता येईल.

sharad-pawarशरद पवार- राजकारण अक्षरश: कोळून प्यायलेली व्यक्ती आणि दिल्लीमध्ये सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राजकारणी म्हणजे शरद पवार. राजकारणातील अचूक टायमिंग आणि चलाखपणा ही पवारांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून अनेकांच्या टीकेचे लक्ष्य असला तरी, पवारांनी राजकारणातली स्वत:ची पत आजही टिकवून ठेवली आहे. त्यामुळेच २०१४मध्ये शरद पवार इंटरनेटवर सर्वाधिक वेळा शोधण्यात आलेल्या भारतीय राजकारण्यांमध्ये दहाव्या स्थानावर आहेत.