भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या उर्दु संकेतस्थळाचे आज(बुधवार) अनावरण केले. देशातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदींनी हा नवा हातखंडा आजमावून पाहण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. अभिनेता सलमान खान यांचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. अर्थात मोदींच्या सहमतीनेच उर्दू संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
या संकेतस्थळावर नरेंद्र मोदींबद्दलची संपूर्ण माहिती, त्यांचा जीवनप्रवास, भाषणे, मुस्लिम समाजाप्रति केलेली कामे यांचा आढावा अशी सर्व साठवण यात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मोदींचे उर्दु भाषेतील भाषणेही या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. नरेंद्र मोदींचे उर्दु संकेतस्थळ- http://www.narendramodi.in/lng/urdu/