भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वैवाहिक स्थितीसंदर्भात तीन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अहमदाबाद येथील स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
मोदींवर वैवाहिक माहिती लपविण्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती यावर सुनावणी देताना न्यायाधीश एम.एम.शेख यांनी मोदींच्या वैवाहिक स्थितीबद्दल माहिती सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
गुजरामध्ये याआधी झालेल्या सर्व निवडणूकीत मोदींनी आपल्या वैवाहिक स्थितीसंदर्भातील माहिती लपविल्याचा आरोप आपचे कार्यकर्ते निशांत वर्मा यांनी केला आणि पोलीस ठाण्यात त्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु, पोलीसांनी तक्रार दाखल करु न घेतल्याने वर्मा यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने मोदींच्या वैवाहिक माहिती देण्याबाबतचे आदेश पोलिसांना दिले आहेत.