पारपत्र नाकारण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी आपल्या पतीने पारपत्रासाठी लग्नाशी संबंधित कुठली कागदपत्रे सादर केली होती, अशी विचारणा माहिती अधिकार कायद्यान्वये मागविलेल्या माहितीत केली आहे. जसोदाबेन यांनी मोदी यांच्याशी लग्न झाल्याचा पुरावा म्हणून लग्न प्रमाणपत्र अथवा संयुक्त प्रतिज्ञापत्र केले नसल्याचे कारण देत पारपत्र कार्यालयाने मागील नोव्हेंबरमध्ये त्यांचा अर्ज फेटाळला होता.
त्यांच्या अर्जाला विहित कालावधीत उत्तर देण्यात येईल, असे प्रादेशिक पारपत्र अधिकारी झे. ए. खान यांनी सांगितले.
मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना त्यांनी स्वतचे पारपत्र मिळविताना लग्नासंदर्भातील कुठली कागदपत्रे सादर केली, अशी विचारणा जसोदाबेन यांनी आपल्या अर्जात केल्याची माहिती त्यांचे बंधू अशोक यांनी दिली.