पं. जवाहरलाल नेहरू यांच्या वारशावर त्रयस्थ आपला हक्क सांगत असून, त्यांच्याकडून नेहरूंनी मांडलेल्या संकल्पनांचा विपर्यास होण्याचा धोका आहे, असा हल्ला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी भाजपचा नामोल्लेख न करता चढविला. बिगर एनडीए पक्षांपर्यंत पोहोचून धर्मनिरपेक्ष आघाडी तयार करणे ही अपरिहार्य गरज असल्याचे मतही सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी, प्रकाश करात, सीताराम येचुरी, एच. डी. देवेगौडा, शरद यादव, डी. राजा, डी. पी. त्रिपाठी आदी नेते उपस्थित होते.  
पं. नेहरूंचे जीवन आणि कार्य यांची माहिती आणि महती सांगणाऱ्यांची संख्या सध्या कमी होत चालली असून, त्याचा फायदा उठवून त्रयस्थ त्यांच्या संकल्पनांचा विपर्यास करीत आहेत. नेहरू आणि म. गांधी यांच्यासाठी धर्मनिरपेक्षता महत्त्वाची होती, धर्मनिरपेक्षतेविना भारतीयत्व किंवा भारत असूच शकत नाही, त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही सध्याची अपरिहार्य गरज आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. बहुवांशिक, बहुभाषक, बहुधार्मिक समाजाला केवळ संसदीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्षताच एकत्रित ठेवू शकते, यावर नेहरूंचा विष्टद्धr(२२४)वास होता आणि तेच सत्य असल्याचे सिद्ध झाले
आहे. या परिषदेला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपच्या अन्य कोणत्याही नेत्याला निमंत्रित केले नव्हते.