नाहीत, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सरकारची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी २४ जुलै रोजी होणाऱ्या नीट परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे.
‘नीट‘चा पहिला टप्पा १ मे रोजी पार पडला होता. या परीक्षेचा दुसरा टप्पा २४ जुलै रोजी होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात नीट न दिलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देता येईल, असे न्यायालयाने निकालात सांगितले आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल १७ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेच्या सक्तीस महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांनी विरोध दर्शविला होता.
विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब एवढीच की,  ‘नीट १’ देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना ‘नीट २’ परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या मते ‘नीट १’ परीक्षा व्यवस्थित पार पडली नाही किंवा परीक्षेची पूर्ण तयारी झाली नव्हती, त्या विद्यार्थ्यांनाही नीट २ देण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नीट १ ची उमेदवारी रद्द करावी लागणार आहे.