नेहरू-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंबियच काश्मिरातील पेचप्रसंगाला जबाबदार असल्याची टीका भाजपने केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दूल्ला यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

काश्मिर प्रश्न सोडवण्यासाठी त्रयस्त व्यवस्थेची मदत घ्यायला हवी, असे अब्दुल्ला यांनी सुचवले होते. यावर अब्दुल्लांची ही सूचना बेजबाबदार आणि निषेधार्ह असल्याचे भाजपने म्हटले होते. त्याला अनुसरुनच प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी नेहरू-गांधी आणि अब्दूल्ला कुटुंबियांवर खळबळजनक आरोप केला आहे.

तर भाजपचे दुसरे एक नेते दिलीप घोष म्हणाले की, अब्दुल्लांचे राजकारण आणि त्यांच्या राजकीय सूचनांचा काहीही उपयोग नाही. अब्दुल्लांचे बोलणे हे नेहमीच विभाजनवाद्यांच्या बाजूचे असते तसेच ते बऱ्याचदा पाकिस्तानच्ये बाजूनेही बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे घोष यांनी म्हटले आहे.

काश्मिरचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताने अमेरिका, चीनसारख्या त्रयस्थ देशांची मदत घ्यायला हवी. त्यांच्या मध्यस्थीने यासाठी प्रयत्न करायला हवेत असे फारुख अब्दूल्ला म्हणाले होते.
[jwplayer dy7r2d6R]