नेपाळमधील पश्चिमेकडील दोती जिल्ह्य़ात सोमवारी एक बस तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३० जण ठार झाल्याचे उघड झाले आहे. दसऱ्याचा सण आटोपून परत निघालेल्या भाविकांनी खच्चून भरलेली ही बस खोल दरीत कोसळली होती. बसमध्ये क्षमतेच्या दुप्पट म्हणजे सुमारे १०० प्रवासी भरण्यात आले होते. त्यातच  मुसळधार पावसामुळे या परिसरातील रस्तेही अतिशय खराब झाले होते. एका अवघड वळणावर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस सुमारे ३०० मीटर दरीत कोसळली. सोमवारी या अपघातातील २५ मृतदेह हाती लागले होते. परंतु बचावकार्य सुरू असताना मंगळवारीआणखी ५ मृतदेह आढळून आले.