वाढती असहिष्णूता आणि देश सोडण्याचा विचार यावर अभिनेता आमीर खानने केलेल्या वक्तव्यावरून त्याच्यावर सर्वबाजूंनी टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांसोबतच नेटिझन्सनीही त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लोकसत्ता संकेतस्थळावरही अनेकांनी प्रतिक्रिया लिहून आपली भावना स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. आमीरच्या वक्तव्यामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत…
– कुठे व कधी जातोय ते सांग, म्हणजे आम्ही सोडायला येऊ. जमले तर त्या देशात, नाही तर किमान विमानतळापर्यंत तर नक्कीच येऊ. अन्य देशातील वास्तव्यासाठी हार्दिक शुभेच्छा – हेमंत पाटील
– ज्या देशाने पैसा, प्रसिद्धी, मान दिला तो देश अडचणीत असेल तर सोडून जायचा? असहिष्णुता आता कुठे नाही आणि कधी नव्हती? प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्या बोलण्यातून सामान्य लोकांना मार्ग दाखवावा. उलट, सुलट विधानाने असहिष्णुता वाढेलच. – अपर्णा
– आमीरचे वक्तव्य न पटणारे आहे. शुद्ध राजकीय वाटते. मुंबईत जेव्हा दंगे झाले तेव्हा कोणती परिस्थिती होती? यापेक्षा भयानक स्थिती या देशाने पहिली आहे. तेव्हा देश सोडण्याचा विचार आला होता का? भारतापेक्षा सहिष्णू देश कोणता? काँग्रेसच्या काळात असा विचार आला होता का? असहिष्णुता हा राजकीय तमाशा होता बिहारसाठी. देशात सामान्य माणसाला कोठेही असहिष्णुता दिसत नाही. मग सेलेब्रिटी असले म्हणून काहीही बोलायचे काय? देश सोडणे ही कोणती देशभक्ती? आमीरने राजकारण करू नये. – सुभाष उत्तरवार
– देश सोडण्याबाबत अभिनेता आमीर खानने केलेल्या वक्तव्यामुळे मी हैराण झालो आहे, त्यांचे वक्तव्य अतिशय दु:खद आहे. आमिरने भारतमातेचा अपमान केला असून त्याबद्दल त्याने माफी मागायला हवी. जर त्याला भारतात राहायची भीती वाटत असेल, तर जिथे शांती मिळेल, तिथे जाण्यास तो स्वतंत्र आहे. – संतोष
– तू खुशाल देश सोडून जा… जाताना सगळे पुरस्कार पण दे… तुझी इथे कोणाला गरज नाही – अभिजित नाडकर्णी
– आमिर खान कडून ही अपेक्षा नव्हती. सत्यमेव जयतेमुळे त्याची एक चांगली प्रतिमा माझ्या मनात निर्माण झाली होती. आता तिला नक्कीच धक्का लागला आहे. असहिष्णुता या शब्दाची या लोकांनी मज्जाच करून ठेवली आहे. – मकरंद
– Over acting….. आमीर खान साहेब… जर तुम्ही मुस्लिमेतर धर्मीय असता आणि मुस्लिम प्रभावित देशात तुम्हाला असा विरोध प्रदर्शित करायचा असता तर तुम्ही करू शकला असता का, याचा थोडा विचार करा. तुमच्या पत्नीला रोजचे वृत्तपत्र उघडण्याचीही भीती वाटते ही अतिशयोक्ती झाली…. फ्रान्समध्ये बॉम्बस्फोट घडल्यानंतर काय निर्णय घेतले गेले आणि त्याला किती विरोध झाला आणि किती पाठिंबा मिळाला, याचा आढावा घ्या जरा. या देशाच हेच तर रडगाणे आहे, इथे कुणीही उठून काहीही मत देऊ शकतो… वृत्तपत्र उघडण्याचीही भीती म्हणतात हे. – निखील