‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते का, याचा शोध घेण्यासाठी एक सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला असून हा आयोग सहा महिन्यात अहवाल सादर करणार आहे. अहलाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार निवृत्त न्यायमूर्ती विष्णू सहानी यांचा एकसदस्यीय आयोग याप्रकरणाची चौकशी करेल. उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे १९८५ पर्यंत गुमनामी बाबा वास्तव्याला होते. काहीजणांच्या मते ते सुभाषचंद्र बोस होते. उच्च न्यायालयाने २०१३ मते गुमनामी बाबा ‘अद्वितीय व्यक्ती’ असल्याचे सांगत याप्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले होते. गुमनामी बाबा यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे अयोध्या आणि फैजाबाद येथे व्यतीत केली. ते नेताजी सुभाषचंद्र बोस होते असा बहुतेकांचा अंदाज आहे. १९८५ मध्ये त्यांचा मृत्यु झाल्यानंतर नेताजींच्या कुटुंबातील सदस्य ललिता बोस आणि फैजाबादस्थित सुभाष चंद्र बोस विचार मंच यांनी त्यांची ओळख जाहीर करावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.