जगातील लोकप्रिय सामाजिक संकेतस्थळ असलेले फेसबुक काही काळ बंद पडल्याने वापरकर्त्यांनी ट्विटरवर टिप्पणी करीत तक्रारीही केल्या. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी झाला होता.
फेसबुकच्या डाऊनडिटेक्टर डॉट कॉम या संकेतस्थळानुसार तासाभरापेक्षा कमी काळ फेसबुकची सेवा बंद होती. त्या वेळी हजारो लोकांना फेसबुकचा अ‍ॅक्सेस मिळाला नाही. असाच प्रकार जून महिन्यात झाला होता. फेसबुक वापरकर्त्यांनी ट्विटरवर कुचकट टिप्पणी केली. त्यात फेसबुक डाऊन हा हॅशटॅग वापरण्यात आला.
 एकाने ट्विट केले आहे, की फेसबुक बंद आहे. आता फेसबुक बंद असल्याबाबत मित्रांच्या प्रतिक्रिया मी कशा जाणून घेणार? आणखी एकाने लिहिले आहे, की फेसबुक १५ मिनिटे बंद होते तरी आजची पिढी वाचली आहे. एका ट्विटर वापरकर्त्यांने द ट्विट ऑफ गॉड हे ट्विट हँडल वापरून लिहिले आहे, हॅशटॅग फेसबुक डाऊन. कृपया, शांत रहा, लोकांशी संपर्काचा प्रयत्न करू नका.
फेसबुकने म्हटले आहे, की काही लोकांना फेसबुक बंद असल्याने त्रास झाला आहे, फेसबुकचे कामकाज सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न वेगाने सुरू आहे.