येथील एका महाविद्यालयातील वर्गात मुले काही मुलींसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत  असल्याचे  फेसबुकवर टाकण्यात आलेले छायाचित्र संगणकाचा वापर करून तोडमोड करून टाकले आहे, ते खरे नसून बनावट आहे, असा दावा त्यांच्यापैकी एका मुलीने केला आहे. दरम्यान  मुलीला अगदी खेटून झोपलेल्या मुलांचे छायाचित्र फेसबुकवर टाकल्याबद्दल सहा मुलांवर निलंबनाची कारवाई संबंधित महाविद्यालयाने केली आहे.
सुरतकल पोलीस स्टेशनला याबाबत एका मुलीने तक्रार नोंदवली होती त्यात असे म्हटले होते की, आपले फेसबुक खाते हॅक करून त्यात आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आले.
तिने सांगितले की, एका सहकारी विद्यार्थ्यांने हे छायाचित्र १८ फेब्रुवारीला काढले होते व नंतर फेसबुकला टाकले होते. तिने असा दावा केला की, खोडसाळपणा करणाऱ्यांनी आपले फेसबुक खाते हॅक केले व त्याची तोडमोड करून ते पुन्हा फेसबुकवर टाकले. त्याचा गैरवापर करण्यात आला.
विद्यार्थ्यांवर कारवाई
सुरतकल पोलीस सूत्रांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून तपास चालू आहे. या घटनेने वाद झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालय अधिकाऱ्यांना संबंधित विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची मागणी केली.
त्यानुसार सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाने या मुलांवर कारवाईचा विचार सुरू केला आहे.
 या प्रकरणी महाविद्यालयाने म्हटले आहे की, या छायाचित्राच्या वादामुळे विद्यार्थी समुदायात भावनिक उद्रेक झाले. काही अज्ञात लोकांनी त्या विद्यार्थ्यांला जबर मारहाण केली व आता त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.