आयसिसच्या कारवाया आणि या दहशतवादी संघटनेचे आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे प्रयत्न ओळखण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फेसबुक, ट्विटर आणि व्हॅट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल नेटवर्किंगचे सहकार्य मागितले आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॅट्सअ‍ॅप, केआयके आदी समाजमाध्यमांना या बाबत विनंती करण्यात आली असल्याचे एनआयएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परस्पर कायदेशीर सहकार्य करारानुसार ही विनंती करण्यात आली आहे.
आयसिसशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करून बारतात पाठविण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांच्या एनआयए कोठडीत वाढ करावी, अशी मागणी करताना यंत्रणेने वरील माहिती न्यायालयात उघड केली.सदर दहशतवादी माहितीचे महाजाल आणि सोशल नेटवर्किंग साइटचा भरतीसाठी मोठय़ा प्रमाणावर वापर करीत असल्याचे आढळले.