उत्तर गोव्यातील म्हापसा येथे नायजेरियन नागरिकाने एकतीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या महिलेस चाकूचा धाक दाखवून पारा या ठिकाणाहून पळवून नेण्यात आले होते. याबाबत कलम ३६५, कलम ५०६, कलम ३४२, कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. दोन नायजेरियन व्यक्तींपैकी एकाने या महिलेस बंदुकीचा धाक दाखवून खोलीवर नेले व बलात्कार केला. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी सायंकाळी सव्वाचार ते सायंकाळी ७ दरम्यान ही घटना घडली, ही महिला स्कूटरवरून जात असताना पारा येथे दुचाकीवरील नायजेरियन लोकांनी तिला थांबवले व नंतर ते तिला आसगाव येथे घेऊन गेले. नंतर एक खोली भाडय़ाने घेतली, त्यांनी अगोदर तिला लैंगिक छळ न करण्याचे पटवून दिले व नंतर बलात्कार केला, सदर महिला तेथून निसटली व स्कूटरवर पोलीस स्थानकात येऊन तक्रार दिली. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन नायजेरियन नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जेथे बलात्कार करण्यात आला तेथे पोलीस गेले होते व त्यांनी नंतर आरोपी तेथे येतील या आशेने बराच काळ वाट पाहिली पण रविवारी सायंकाळपर्यंत तेथे कुणीही आले नाही. म्हापसा पोलीस पुढील तपास करीत आहेत.