केंद्र सरकारने नीती आयोगात दोन सल्लागारांच्या नेमणुका केल्या असून विविध मंत्रालयात दहा सहसचिवांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. आलोक कुमार व जितेंद्र कुमार यांना सल्लागार नेमण्यात आले आहे. आलोक हे १९९३ च्या तुकडीतील उत्तरप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत तर जितेंद्र कुमार हे भारतीय वनसेवेतील उत्तराखंड केडरचे अधिकारी आहेत.
 अ‍ॅना रॉय यांना आर्थिक सेवा विभागात सह सचिव नेमण्यात आले असून या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे आदेश कार्मिक व प्रशिक्षण विभागाने काढले आहेत, श्रीमती रॉय या १९९२ च्या तुकडीतील वित्त सेवा अधिकारी असून त्यांचा कार्यकाल ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत राहील. त्यांची संचालक म्हणून नेमणूक केली आहे. आयएएस अधिकारी संजय प्रसाद यांना विज्ञान तंत्रज्ञान खात्यात सहसचिव नेमले आहे. जितेंद्रकुमार सिन्हा हे मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी असून त्यांना ईशान्य विभाग मंत्रालयात सह सचिवपद देण्यात आले आहे. टपाल व दूरसंचार खात्यात असलेले महंमद शाहबाझ अली यांना राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळात सहसचिवपदी नेमण्यात आले आहे. भारतीय वनसेवेतील अधिकारी राजीव कुमार यांना इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान, जगमोहन गुप्ता यांना जलसंपाद व गंगा शुद्धीकरण खात्यात नेमणुका मिळाल्या. वेणुगोपाळ रेड्डी गड्डाम यांना कामगार व रोजगार खात्यात सहसचिव पद दिले आहे. नवनीत सोनी यांना राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणात सदस्य सचिव करण्यात आले आहे.

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा