बिहारमधील पूरस्थितीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.

गंगा नदीतील गाळ काढण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे, अशी मागणीही कुमार यांनी यावेळी केली. बिहारमधील नद्यांची पातळी ऐतिहासिकरित्या वाढल्यामुळेच पूरस्थिती उद्भवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गंगा स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या योजनेचे नितीशकुमार यांनी  कौतुक केले. बिहारमधील पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांची समिती पाठवावी, असेही कुमार यांनी म्हटले आहे. या पूरस्थितीमुळे ९५ पेक्षा अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.