पंतप्रधानपदाच्या शपथविधीदिनी नरेंद्र मोदींना बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार शुभेच्छा दिल्याअसून त्यांच्याकडून देशाला भरपूर अपेक्षा असल्याचे म्हटले. यामध्ये बिहार राज्याला विशेष दर्जा देण्याची अपेक्षाही कुमार यांनी आवर्जून सांगितली.
नरेंद्र मोदींवरील आरोप आणि त्याचे खंडन
नितीश कुमार म्हणाले की, “नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला याआधीही मी शुभेच्छा दिल्या आहेत. आज पुन्हा एकदा शपथविधी दिनाच्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा असून त्यांच्याकडून ‘भरपूर अपेक्षा’ आहेत.” असेही ते पुढे म्हणालेत. तसेच राज्यातील उर्वरित केंद्रीय प्रकल्प त्वरित पूर्ण व्हावेत, राज्यातील युवकांचे रोजगारासाठी स्थलांतर होऊ न देण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न व्हावेत अशी बिहारमधील जनतेची अपेक्षा असल्याचेही कुमार म्हणाले.
गेल्या वर्षभरात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. परंतु, कुमार यांनी आज मोदींना शुभेच्छा देऊन नव्या सरकारकडून अपेक्षापूर्ती होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
जबाबदारी अपेक्षा पूर्ण करण्याची!