बोफोर्स तोफा खरेदीप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा निकाल देशातील कोणत्याही न्यायालयाने आजपर्यंत दिलेला नाही. माध्यमांनी या विषयाला अकारण प्रसिद्ध देऊन त्याचा बाऊ केल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी परदेशातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
स्वीडनच्या दौऱयावर जाण्यापूर्वी तेथील ‘डॉइजू हेटर’ वृत्तपत्राचे मुख्य संपादक पीटर वोलोडालस्की यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बोफोर्स संदर्भात आपले मत मांडले. ते म्हणाले, माध्यमांनी कथित बोफोर्स घोटाळ्यावरून टीका करण्यास सुरूवात केल्यानंतर काही वर्षांनी मी देशाचा संरक्षणमंत्री झालो होतो. त्यावेळी माझ्या निरीक्षणाप्रमाणे बोफोर्स तोफा या सर्वोत्कृष्ट होत्या. आजही भारतीय लष्कर बोफोर्स तोफांचा वापर करीत आहे. बोफोर्समध्ये घोटाळा झाल्याची चर्चा फक्त माध्यमांमध्येच सुरू असते.
ही मीडिया ट्रायल आहे का, असे विचारल्यावर मुखर्जी म्हणाले, मी ते सांगू शकणार नाही. मी तो शब्द वापरलेला नाही. मी एवढेच सांगू शकतो, की माध्यमांनी त्या विषयाला अवास्तव प्रसिद्धी दिली. पण आतापर्यंत कोणत्याही न्यायालयाने त्यामध्ये गैरव्यवहार झाला होता, असे सांगणारा निकाल दिलेला नाही.

Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार