जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साहित्यातील मॅन बुकर पुरस्काराच्या यादीवर अमेरिका आणि ब्रिटिश लेखकांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदाच्या यादीत एकाही भारतीयाला स्थान मिळालेले नाही. ब्रिटनमधील सहा, अमेरिकेतील पाच आणि ऑस्ट्रेलिया व आर्यलडमधील प्रत्येकी एका कादंबरीचा यादीत समावेश झाला आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक नील मुखर्जी यांचा यादीत समावेश आहे.