मुस्लिमांनी योग करावा की नाही यावर बरीच मतमतांतरे आहेत. योग हा धर्माशी संबंधित आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तर काही लोक हा व्यायामाचा एक भाग असल्याचे मानतात. यासंदर्भात आता सुन्नी पंथाचे मौलवी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद राशीद फिरंगी महली यांनी एक वक्तव्य करून चर्चेला पुन्हा तोंड फोडले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मुस्लिमांच्या सहभागास आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण त्यांनी या कार्यक्रमात होणाऱ्या पूजेत सहभागी होऊ नये. त्यापासून दूर राहावे, असे ते म्हणाले. योग करणे ही चांगली बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रमाबाई आंबेडकर मैदानात २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ५५ हजार लोक सहभागी होणार आहेत. ३०० मुस्लिम पुरुष आणि महिलाही सहभागी होणार आहेत, असे वृत्त आहे. या कार्यक्रमातील समावेशाबाबत मौलवींनाही विचारण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यास सहभागाबाबत नक्कीच विचार करू, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी मुस्लिमांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योग करण्यात काहीच अडचण नाही. पण कार्यक्रमात होणाऱ्या पूजेपासून दूर राहावे, असेही ते म्हणाले.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
maharashtra budget analysis maharashtra deficit budget from last 15 years
गेल्या १५ वर्षांत तुटीच्या अर्थसंकल्पाकडे कल
BJYM, National Convention, Nagpur, Lok Sabha Elections, Prominent Leaders, Attend,
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात भाजयुमोचे राष्ट्रीय अधिवेशन, जे पी नड्डांसह भाजपचे मोठे नेते येणार

दरम्यान, योगदिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी १४ मे रोजी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला. कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोदींसह लखनऊ विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील आठ हजार विद्यार्थी योग करणार आहेत.