गोवा राज्यास केंद्र सरकारकडून विशेष दर्जा मिळण्याची शक्यता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी फेटाळली आहे. त्यांनी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त सांगितले की, गोव्याला केंद्र सरकारकडून विशेष दर्जा मिळणे म्हणजे मृगजळासारखे आहे. आपण त्याच्या पाठीमागे धावणार नाही कारण असा दर्जा मिळण्याची शक्यता नाही. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या अलीकडच्या गोवा दौऱ्यात राज्याला विशेष दर्जा देण्याची शक्यता फेटाळली होती.