घरवापसी कार्यक्रमात काहीही गैर नाही असे सांगत विश्व हिंदू परिषदेने सक्तीने होणारे धर्मातर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या मागणी येथील हिंदू संमेलनात करण्यात आली.
संसदेत धर्मातरविरोधी कायद संमत करावा. त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी सहकार्य करावे, असे आवाहन विहिंपचे कार्यकारी प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी केले. विहिंपच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मातर बंद करा व घरवापसीला प्रतिसाद द्या असे आवाहन तोगडिया यांनी केले. आपण जर खबरदारी घेतली नाही तर आसाम, पश्चिम बंगाल व केरळमध्ये हिंदूंच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, असा इशारा तोगडिया यांनी दिला. अमेरिकेत मंदिरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे धार्मिक सहिष्णुतेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आम्हाला सल्ले  देऊ नयेत असे बजावले.