अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाचे सदस्य म्हणून पुढील आठवडय़ात अमी बेरा आणि तुलसी गबार्ड हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक शपथ घेणार आहेत. अमी बेरा हे कॅलिफॉर्नियास्थित फिजिशियन असून ते पंजाबचे आहेत, तर तुलसी गबार्ड यांचा इराक युद्धात सहभाग असून अमेरिकेच्या काँग्रेसची निवडणूक जिंकणारे ते पहिले हिंदू आहेत. नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस सदस्यांचा शपथविधी समारंभ ३ जानेवारी रोजी होणार असून नव्या काँग्रेसमध्ये आफ्रिका-अमेरिका वंशाचे ४३ सदस्य आहेत. बेरा (४७) हे कॅलिफॉर्नियाचे, तर गबार्ड हे हवाईचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या टेमोक्रॅटिक पक्षाचे ते सदस्य आहेत.
अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंची लोकसंख्या एक टक्क्याहूनही कमी आहे. गबार्ड हे गीतेवर हात ठेवून शपथ घेतील, अशी शक्यता आहे.