एका सत्तर वर्षांच्या महिलेचा पेन्शनसाठी नाव नोंदवण्याच्या रांगेत दोन तास उभे राहिल्याने थकवा येऊन मृत्यू झाला. ‘सरकार आपल्या दाराशी येणार’ अशा घोषणा केल्या जात असताना वृद्धांवर अजूनही ही वेळ येत आहे.
कोठापेटचे जिल्हा पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वरलू यांनी सांगितले, की कोलापेट येथे पेन्शन योजना नोंदणीसाठी कोठापेट येथे पहाटे तीन वाजेपासून रांगा लागल्या होत्या. सदर महिला दोन तास रांगेत उभे राहून त्या दमल्या. पदल कांतम्ना असे त्यांचे नाव आहे. पहाटे पाच वाजता त्या रांगेत कोसळल्या नंतर नातेवाइकांनी त्यांना घरी नेले. घरी परतल्यावर त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले म्हणून त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. त्यांना हृदयविकार आला किंवा काय हे समजू शकले नाही.